सोलापूर: एक वर्षाची बालिका विक्रीसाठी नेणाऱ्या दोन महिला गजाआड

 

मुंबई येथून दोन महिलांनी एक वर्षाच्या बालिकेचे अपहरण केले. बालिकेचे अपहरण करून विक्रीसाठी हैद्राबादला गेले. 


बोलणी फिस्कटल्याने त्या हुसेन सागर एक्सप्रेसने परत मुंबईला निघाले असता सोलापूर रेल्‍वे पोलिसांना याबाबत माहिती मिळताच दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केली.


पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मुंबई येथून एक वर्षाच्या लहान मुलीला दोन अज्ञात महिलांनी अपहरण केल्‍याची घटना वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. 

यानंतर पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरू केला.मुंबईत अपहरण करून त्‍या महिला विक्रीसाठी हैद्राबादला गेले. मात्र बोलणी फिस्कटल्याने त्या हुसेन सागर एक्सप्रेसने परत मुंबईला निघाल्या. याबाबत सोलापूर आरपीएफ जवानांना मिळताच हैदराबादहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेसची स्थानकावर झडती घेतली असता दोन महिला आढळले. 


पोलिसांनी त्यांना ताब्‍यात घेवून चौकशी केली. त्‍यानंतर त्‍यांनी अपहरण केल्‍याचे कबुली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments