सोलापूर: खासगी बस व कारचा अपघात पंढरपुरातील तिघांचा जागीच मृत्यू

 

मोहोळ/सोलापूर : सोलापूरहुन पंढरपूरकडे निघालेल्या कारला मोहोळकडे भरदाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक देऊन झालेल्या आपघातात पंढरपूर येथील तीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना १२ नोहेबंर रोजी रात्री १ वाजनेचे दरम्यान मौजे पेनुर हदीत गजाजन पेट्रोल पंपाचे जवळ घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथे सलुनचा व्यवसाय करणारे आहेत. 


दत्ताराम नारायण जाधव हे पंढरपूर येथे मुलगी व जावई यांना भेटण्यासाठी आले होते. दरम्यान, ११ नोहेंबर रोजी दुपारी त्यांचा जावई प्रशांत एकनाथ शेटे (वय ३५) व त्याचे मित्र सुरज दिलीप कदम


 (वय २५ ) व ऋषीकेश रामकृष्ण साखरे (वय २५ रा तिघे पंढरपूर) असे मिळून कार क्र . एम. एच.१३/ डी. एम.९५६२ मध्ये सोलापूर येथे शोरूमला जावून येतो म्हणून गेले होते. सोलापूर हुन परत पंढरपूरकडे येत असता दि. १२ नोहेंबर रोजी रोजी रात्रौ ००.१० वा. चे. मौजे पेनुर हदीत गजाजन पेट्रोल पंपाचे जवळ


मोहोळ ते पंढरपूर रोडवर विरूध्द दिशेने जाणारे टॅम्पो ट्रॅव्हल क्र .एम.एच.१३/ए.एक्स.०४४५ या वाहनाने धडक दिली असून त्यात कार मधील तिन इसमांना मार लागून ते गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले . या आपघातातदोन्ही वाहनाचे मिळून अंदाजे


 २,००,०००/- रू.चे नुकसान झाले असून दत्ताराम नारायण जाधव (वय ६५ धंदा सलुन व्यवसाय रा. लोकमान्य नगर, ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारी नुसार टेम्पो चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास आपघात पथकाचे सहाय्यक फौजदार पवार करीत आहेत.


Post a Comment

0 Comments