फलटण - पंढरपूर रोडवर विडणीमध्ये ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या घरात

 

आळंदी पंढरपूर महामार्गावरील फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या हद्दीत अब्दागिरेवाडी येथे डांबरी रस्ता सोडून सुमारे


 चाळीस फूट आतमध्ये असलेल्या घरामध्ये भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या घरामध्ये घुसला असल्याची घटना नुकतीच घडली आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी कि, फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या


 अब्दागिरीवाडी येथील सतीश अब्दागिरे यांच्या घरामध्ये भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर गेला आहे. 


सतीश अब्दागिरे यांचे घर मुख्य डांबरी रस्त्यापासून सुमारे चाळीस फूट आतमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.


 माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील असलेला हा ट्रॅक्टर विडणी कडून फलटण कडे चाललेला होता. दोन ट्रॅक्टरची धडक होऊन हा ट्रॅक्टर घरामध्ये गेला असल्याची घटना घडली आहे.


Post a Comment

0 Comments