जेलमधून बाहेर आल्यावर तुझा नंबर ! आई - वडिलांसह कुटुंबातील चार जणांना संपवणाऱ्या मुलाची भावाला धमकी

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण  ताजं असतानाच दिल्ली हत्येच्या एका घटनेने पुन्हा हादरली आहे. 


व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका मुलाने आई, वडिल, बहिण आणि आजीची निर्घृण हत्या करत संपूर्ण कुटूंबच संपवलं 


हत्या केल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. 


दिल्लीतल्या  पालम परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपी मुलाचं नाव केशव असं असून तो 25 वर्षांचा आहे. 


आरोपी केशवला पोलिसांनी अटक केली, पण अटक करण्याआधी त्याने चुलत भावाला धमकी दिली. 

जेलमधून जेव्हा बाहेर येईन त्यावेळी तुझा नंबर असेल असं धमकावल्याचं चुलत भाऊ कुलदीप सैनी याने सांगितलं. 


केशवला आपल्या कृत्यावर अजिबात पश्चाताप नसल्याचंही कुलदीप सैनीने सांगितलं. Post a Comment

0 Comments