सोलापूर: संग्रामनगर गोळीबार प्रकरणातीलआरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

 

संग्रामनगर (ता. माळशिरस) येथे टोळीयुद्धातील पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबार प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.


यातील एका आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, डिसेंबर २०१६ रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास संबंधित आरोपींनी नाना आसबे या व्यक्तीवर बंदुकीने गोळीबार केलेला होता.


 त्यानंतर दोन्ही मारेकरी दुचाकीवरून पळून गेले होते. यावेळी उपचारादरम्यान नानासाहेब आसबे यांचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद अनिकेत उंबरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिल


त्यानंतर पोलिसांनी याबाबत अधिक तपास घेण्यास सुरुवात केली. यामध्ये नानासाहेब आसबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्तींपैकी देवा जाधव या आरोपीला अटक केली.


 त्याने प्रदीप पांडुरंग माने, रमेश विश्वनाथ धुळे, दशरथ विठोबा माने, राजू मधुकर भोसले, साजिद इब्राहिम सय्यद, सागर प्रताप मोहिते, सचिन दामोदर एखतपुरे यांनी संगनमत करून व कट रचून हा खून केल्याचे कबूल केले.


पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. तसेच या गुन्ह्यामधील सर्व आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत दोषारोपपत्र दाखल केले. यामधील राजू भोसले या आरोपीने जामीन अर्ज दाखल केलेला होता. गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ कारागृहात असल्याचे त्याने यासाठी कारण दिलेले होते. मात्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Post a Comment

0 Comments