विचित्र अग्नितांडव टँकरचा उडाला भडका , 7 गाड्या जळून खाक

 

लातूर जिल्ह्यातून अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ट्रक, उसाचा ट्रॅक्टर आणि डिझेल टँकरचा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर 7 वाहनं जळून खाक झाली 


अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातल्या भातखेडा गावाजवळ नांदेड महामार्गावर रात्री 2 च्या सुमारास हा अपघात घडला. डिझेल-पेट्रोल घेऊन जाणारा टँकर व उसाच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. जवळून जात असताना टँकर आणि ट्रॅक्टरमध्ये घर्षण झालं त्यामुळे टँकरने अचानक पेट घेतला.


त्यामुळे उसाचा ट्रॅक्टर भक्षस्थानी सापडला. यावेळी टँकर जवळून जाणारा इतर वाहनंही सापडली.  

या अपघातात टँकरसह लागलेल्या आगीत सात वाहने एक एस टी महामंडळाची बस, ट्रक, 2 कार, 2 ट्रॅक्टर हेड, तीन ट्रॅक्टर ट्रॉली अशी सात एकामागे एक असलेली वाहने जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी धाव घेतली.


शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या अपघातात टँकर चालकाचा होरपळून जागिच मृत्यू झाला आह. तर इतर वाहनांचे साहित्यासह मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरातील वाळूजमध्ये हृदयद्रावक अपघात घडला आहे.


या अपघातात एकाच परिवारातील भाऊ आणि दोन बहिणीचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील 3 जणांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाळूजमध्ये औद्योगिक वसाहतीत माल घेऊन जाणारी ट्रक आणि कंपनीत जाणाऱ्या कामगाराच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. 

हा अपघात सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्याजवळ झाला. आसाराम बापूनगर, कमळापूर इथं राहणारे अनिता कचरू लोखंडे (वय 22) आणि निकिता कचरू लोखंडे (वय 18) या दोघी बहिणी वाळूज औद्योगिक वसाहतीतील रेणुका ऑटो कंपनीमध्ये काम करतात.


आज सकाळी नेहमी प्रमाणे सात वाजेच्या सुमारास या दोघी बहिणींना दीपक भाऊ कचरू लोखंडे हा आपल्या दुचाकीवर कंपनीत सोडण्यासाठी निघाला होता. 

रांजणगाव फाट्या जवळून पुढे जाताच मॅन डिझेल कंपनीच्या समोर त्यांच्या पल्सर दुचाकी (एमएच 21,ए एम - 6995)आणि ट्रक (एमएच 04, एफजे - 5288) यांच्यात अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे तिघेही खाली पडले आणि ट्रकच्या पाठी मागच्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.Post a Comment

0 Comments