किरकोळ मुद्द्याच भांडण भोवलं , बाप - लेकाला संपवलं

 

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालूक्यातल्या दुधलम गावात पूर्ववैमनस्यातून पित्रा-पुत्रांची हत्या करण्यात आली आहे.


अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील दुधलम गावात आज रात्री दहाच्या सुमारास हे हत्याकांड घडलं. या घटनेत प्रताप पंडित आणि मुलगा सूरज पंडित या पिता-पुत्रांचा मृत्यू झाला आहे. तर किशोर पंडित असं मारेकरी व्यक्तीचं नाव आहे.


 दरम्यान घरगुती वादातून हे हत्याकांड घडल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं आहे. तरीही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरुच आहे. तसेच, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.


अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दुधलम गावात प्रताप पंडित यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. तर त्यांच्या शेजारीच त्यांचे चुलत भाऊ किशोर पंडित हे राहतात. 


गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या किरकोळ वादातून भांडण व्हायचं. आजही त्यांच्यात घरासमोर पाणी सांडल्यामुळे वाद झाला. याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.


 अन् त्यातूनच दोघांची हत्या करण्यात आली. दरम्यान, या वादात आरोपी किशोर पंडित यानं कुऱ्हाडीनं प्रताप पंडित आणि त्यांचा मुलगा सुरजवर सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात दोघे पिता पुत्र गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आज रात्री दहाच्या सुमारास हे हत्याकांड घडलं आहे. या घटनेची माहिती पिंजर पोलिसांना मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठलं. 

त्यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ञ, श्वान पथक यांच्यासह इतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.


Post a Comment

0 Comments