माळी महासंघाच्या सोलापूर जिल्ह्याच्या प्रसिद्धीप्रमुख पदी प्रमोद बनसोडे यांची निवड

सोलापूर: प्रतिनिधी 

१९८२ साली स्थापन झालेल्या माळी महासंघाच्या सोलापूर जिल्ह्याच्या प्रसिद्धीप्रमुख पदी प्रमोद शिवाजी बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती माळी महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रंगनाथ नाळे यांनी दिली.


  महाराष्ट्रातील माळी समाजातील समस्या सोडविण्यासाठी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संपुर्ण महाराष्ट्रात माळी महासंघ कार्यरत असुन महासंघाच्या माध्यमातून माळी समाजाचा विकासात्मक दृष्टीकोनातून डोळ्यासमोर ठेवून महासंघ भविष्याची वाटचाल करत आहे.


      माळी महासंघ महाराष्ट्रातील राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, रोजगार, कृषीविषयक अशा विविध क्षेत्रात राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उल्लेखनीय कार्य करीत आहे. 


समाजातील नागरिकांना येणाऱ्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी माळी महासंघ अग्रेसर आहे. 


    महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी प्रमोद बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल उद्योजक फोरमचे संस्थापक अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरूण तिखे ,


 राष्ट्रीय उपाध्यक्ष आण्णा गायकवाड, पश्चिम महासचिव चंद्रकांत वाघोले आदींसह अनेकांनी प्रमोद बनसोडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments