घरभाड्याचे डिपॉझिट न देता साडेतीन लाखांची फसवणूक

 

गंगापूर रोड, सोमेश्वर परिसरात भाड्याने फ्लॅट देण्यासाठी डिपॉझिट म्हणून घेतलेली रक्कम घरमालकाला न देता भाडेकरूंची साडेतीन लाखांची फसवणकू केली. तसेच सदरील रक्कमेसाठी तगादा लावल्याने संशयिताने भाडेकरूंनाच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.


याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. 


गणेश पांडुरंग पाटील (२५, रा. योगेश हॉटेलसमोर, खुटवडनगर), निखिल प्रकाश मुदीराज ( ३७, रा. संगीत रेसीडेन्सी, गोविंदनगर) अशी संशयितांची नावे आहेत. 


मोसेस टोटलीसिंग बाबालोला (रा. सेंडिन टॉन, दक्षिण आफ्रिका. सध्या रा. आस्था रेसीडेन्सी, गंगापूर रोड) या युवकाच्या फिर्यादीनुसार, मोसेस बाबालोला व त्याच्या मित्रांना गंगापूर रोड, सोमेश्वर परिसरात भाड्याने फ्लॅट पाहिजे होते. त्यासाठी त्यांचा संशयित पाटील व मुदीराज यांच्याशी संपर्क आला. दोघा संशयितांनी मोसेसकडून ऑनलाईन ६० हजार रुपये घेतले.


त्यानंतर त्यांच्या काही मित्रांकडून एकूण ३ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम घेतली. मात्र फ्लॅट भाड्याने देताना संशयितांनी डिपॉझिटची रक्कम घरमालकांना दिले नाहीत. 


त्यामुळे घरमालकांनी भाडेकरूंकडे डिपॉझिटची मागणी केली. त्यानंतर मोसेस व त्याच्या मित्रांनी संशयित दोघांकडे वारंवार डिझॉझिटच्या पैशांची मागणी केली असता, संशयितांनी टाळाटाळ केली. नंतर संशयितांनी फोन घेणे टाळत त्यांचे ऑफिसही बंद केले.

Post a Comment

0 Comments