सोलापुरात प्रतिष्ठित डॉक्टरकडून वृद्धला बेदम मारहाण

 

सोलापुरात एका प्रतिष्ठित डॉक्टरकडून वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आलीय. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. खरकटे पाणी अंगावर का टाकले विचारल्याने डॉक्टराने फायबर काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप या वृद्ध व्यक्तीने केलाय.

डॉक्टर संदीप आडके असे मारहाण करणाऱ्या डॉक्टरांचे नाव. सोलापुरात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ म्हणून आडके यांचे नाव आहे. तर विजय चौधरी असे मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव आहे. चौधरी हे गवंडी कामगार आहेत.


डॉक्टरांकडून झालेल्या बेदम मारहाणीत चौधरी यांच्या हाताला पाच टाके पडले आहेत.


 याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. चौधरी यांच्या तक्रारीवरून डॉ. आडके यांच्या विरोधात भादवी कलम 323, 324 504, 506 अनुसार सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


संदीप आडके यांनी देखील विजय चौधरी यांच्या विरोधात सदर बाजार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चौधरी दारू पिऊन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा डॉक्टरांनी आरोप केलाय. 


डॉक्टरांच्या तक्रारीनंतर गवंडी कामगार विजय चौधरी यांच्या विरोधातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.

विजय चौधरी हे रस्त्यावरुन जात असताना डॉक्टर आडके यांच्या हॉस्पिटलमधून त्यांच्या अंगावर कुणीतरी खरकटे पाणी टाकले.

 विजय यांनी याबाबत हॉस्पिटलमध्ये जात डॉक्टरांना जाब विचारला. 


मात्र संतापलेल्या डॉक्टरने विजय यांना फायबर काठीने आपल्याला बेदम मारहाण केली, असे चौधरी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments