सोलापूर: माजी मंत्र्याच्या बंगल्यात फटाके फेकले , बार्शीत पाच तरूनांविरोधात गुन्हा दाखल

 

संपूर्ण महाराष्ट्रात 23 ऑक्टोबर रोजी दिवाळी  साजरी करण्यात येत होती.


संपूर्ण राज्यात फाटक्याची आतषबाजी सुरु होती. मात्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात तरुणांच्या एका टोळक्याने चक्क माजी मंत्र्यांच्या बंगल्यात फटाके फेकल्याची घटना घडली. जीवितास आणि मालमत्तेचं नुकसान करण्याच्या हेतूने कृत्य केल्याच्या आरोपातून पाच तरुणांच्या विरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानामोर 23 ऑक्टोबर रोजी 


रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही तरुण फटाके फोडत होते. 


रात्री बंगल्याच्या गेटसमोर फटाके फोडण्याचा आवाज आल्याने दिलीप सोपल यांच्यासह घरातील सर्वजण जागे झाले. यावेळी त्यांनी तातडीने सीसीटीव्ही फूटेज पाहताना पाच जण गेटसमोर आदलीसारखे फटाके (दूरपर्यंत जाऊन आवाज आणि फुटणारा फटका) फोडत होते.


तर त्यातील एकाने आदली फटकासारखा स्फोटक बंगल्याच्या दिशेने तोंड करुन पेटवल्याचे दिसले. तेव्हा हे फटाके गेटवरील सुरक्षारक्षकाच्या खोलीला लागून तिथेच फुटले.


 तर त्याच इसमाने आणखी एक फटाका पेटवून फेकला, पण तो झाडावर आदळून फुटला. तर एका फटाका तर पेटवून चक्क बंगल्याच्या कम्पाऊंडमध्ये फेकला.


सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या सर्व घटनेची पाहणी केल्यानंतर दिलीप सोपल यांनी बार्शीतल्या पाच जणांच्या विरोधात तक्रारी अर्ज दिले. पण काल (3 नोव्हेंबर) या संदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते उर्फ मात्या, निलेश मस्के, अंबादास रणझुंजारे, महेश पवार असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.


Post a Comment

0 Comments