बिग बॉसच्या घरातील सध्या सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत काम केले होते.
मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. यात तिने शेवंता हे पात्र साकारले होते. तिने साकारलेली शेवंता प्रचंड लोकप्रिय झाली. आता बिग बॉसच्या घरातदेखील अपूर्वा कायम चर्चेत राहते.
अनेक सदस्यांशी ती पंगा घेते पण सोबतच काही चांगली मैत्रीण देखील आहे. अपूर्वा नेमळेकरच्या खाजगी आयुष्याविषयी नेहमीच चर्चा होते. आता बिग बॉसच्या घरात तिने आपल्या आयुष्यातील मोठ्या दुःखाचा उलगडा केला आहे. अपूर्वा नेमळेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत ती राखी सावंतला जाब विचारत आहे. पण तिला बोलताबोलताच ती भावुक झाली. राखीने अपूर्वाची नाईट कॅप घेतली त्यावरून अपूर्वा तिच्यासोबत भांडत आहे. अपूर्वा यावेळी म्हणाली, ''तुला वाटतं का राखी मला त्या कॅपने इतका फरक पडेल.
पण आयुष्यात खूप काही गमावलंय मी. सगळं घे माझ्याकडून. पण मला काही फरक पडणार नाही.पुढे ती म्हणते, ''मला जे द्यायचं नव्हतं, जे आयुष्यभर उराशी कवटाळून ठेवायचं होतं ते सुद्धा गमावलंय मी. त्यात या कॅपचं काय घेऊन बसलीस.
माझं मन खूप मोठं आहे राखी. माझं अस्तित्व तर तू घेऊ नाही शकत'' एवढं बोलताच अपूर्वाला अश्रू अनावर झाले.
0 Comments