गेल्या एक महिन्यापासून अभिनेत्री मानसी नाईक आणि नवरा प्रदीप खरेराच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
सतत चर्चेत असणारं लोकप्रिय जोडपं मानसी आणि प्रदीप घटस्फोट घेणार असल्याचं समोर येताच सर्वत्र खळबळच उडाली. त्यांच्या चाहत्यांना तर मोठा धक्काच बसला. कायमच सोबत दिसणारे मानसी आणि प्रदीप गेल्या काही दिवसांपासून एकट्याचेच व्हिडीओ , फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दिवसाला एक पोस्ट करत ते अप्रत्यक्षरित्या एकमेकांवर निशाणा साधत असल्याचं दिसत आहे.
दोघांच्याही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच प्रदीप खरेरानं नवी पोस्ट शेअर केली आहे. प्रदीप खरेराने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, तो हेडफोन कानात घालून गाणं ऐकत आहे आणि गाणी एकता एकता रडतही आहे.
हा व्हिडीओ शेअर करत प्रदीपनं लिहिलं, तुम्ही पण गाणं ऐकून ऐकून रडायला लागता का?. त्याच्या या व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचंचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊसही पहायला मिळतोय.
रडू नका, छान, मानसीला मिस करतोय का, फायर, लव्ह, अशा अनेक प्रकारच्या कमेंट प्रदीपच्या या व्हिडीओवर येत आहेत.
मानसी अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा नवरा प्रदीप खरेरा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून मानसी आणि प्रदीपमध्ये खटके उडाले असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मानसी नाईकने आपल्या सोशल मीडियावरून नवऱ्यासोबतचे सगळे फोटो हटवले आहेत. त्याचसोबत तिने खरेरा हे आडनाव देखील हटवलं आहे.
दरम्यान, प्रदीप आणि मानसीने 2021 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होत नाही तोच दोघेही घटस्फोट घेणार आहेत. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मानसीने एका मुलाखतीत प्रदीपवर अनेक आरोपही केले होते. त्यामुळे दोघांमध्ये लग्नाच्या काही माहिन्यांनतरच घटके उडायला सुरुवात झाली.
0 Comments