पंढरपूर सिंहगड मध्ये "अमेरिकेतील उच्च शिक्षण व नोकरीची संधी" या विषयावर व्याख्यान


पंढरपूर: प्रतिनिधी

एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले वृषभ जैन यांचे "अमेरिकेतील उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधी" या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान आयोजित करण्यात आले.


 

    मंगळवार दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी "अमेरिकेतील उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधी"  या विषयावर वृषभ जैन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान  वृषभ जैन यांचे स्वागत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित पालकांचे हि महाविद्यालयाकडून गुलाब देऊन स्वागत करण्यात आले.


   विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृषभ जैन म्हणाले, परदेशी शिक्षणविषयक मार्गदर्शन करणाऱ्या काऊन्सलरला भेटणं अधिक योग्य ठरेल. शैक्षणिक पार्श्वभूमी आणि गुणवत्ता, परदेशात शिक्षण घेण्यासाठी होणारा खर्च आणि त्यासाठी तुमची असणारी तयारी, अमेरिकेतील कोणत्या संस्थेतून/ विद्यापीठातून शिक्षण घ्यावं आदी गोष्टींबाबत हे काऊन्सलर तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतील. कारण अमेरिकेत प्रत्येक विद्यापीठ हे स्वायत्त आहे. याचा अर्थ येथील प्रत्येक विद्यापीठात/ प्रत्येक कोर्सला विद्यार्थ्याला प्रवेश घेण्याचे पात्रता निकष हे वेगवेगळे असतात. 


त्यामुळे त्या-त्या विद्यापीठाच्या वेबसाइटला भेट द्या आणि माहिती मिळवा. तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे आणि त्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काय निकष आहेत आदी माहिती तुम्हाला या वेबसाइटवरून मिळवता येईल. पदवीनंतर नोकरी करण्याचा किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणं किंवा आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेणं हे पर्याय तुमच्याकडे आहेत असे मत वृषभ जैन यांनी सिंहगड कॉलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.

   उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. 

   सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेतलेले वृषभ जैन हे अमेरिकेत एम. एस. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट यामधुन टेक्सास विद्यापीठातून शिक्षण घेत असुन सध्या पंढरपूर येथे सुट्टीवर आल्यानंतर वृषभ जैन यांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील उच्च शिक्षण व नोकरी याबाबत खुप महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments