सबसे कातिल गौतमी पाटील, असं सोशल मीडिया आणि महाराष्ट्रभर कानावर पडत आहे.
महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये जिच्या नृत्याची चर्चा आहे, सोशल मीडियावर जिचे व्हिडीओ व्हायरल होताहेत त्या गौतमी पाटील विरुद्ध थेट न्यायालयात तक्रार देण्यात आलीये. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या गौतमी पाटील वादात सापडलीये. गावागावातील तिच्या नृत्यांच्या कार्यक्रमाला लोक तुफान गर्दी करतात. मात्र अनेकदा कार्यक्रमांमध्ये राडाही होतो आणि पोलिसांना मध्यस्थी करण्याची वेळ येते.
गौतमी पाटीलचा डान्स खूपच बोल्ड असल्याने काही लोक विचित्र चाळे करतात. परिस्थिती हाताबाहेर जाते. गौतमी डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य करते, असा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर सातारा कोर्टाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
अश्लील हावभाव, बोल्ड नृत्य हे समाजाला दिशाभूल करणारं आहे. हा असा प्रकार लावणी नृत्यात मोडत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी हे असे चाळे करतात आणि स्वत:ला लोक कलावंत म्हणतात. यावर प्रतिभा शेलार यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे. सातारा कोर्टाच्या आदेशानुसार सातारा पोलिस लवकरच गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे गौतमी पाटीलने सर्व आरोप फेटाळले आहेत.
0 Comments