युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

 

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे प्रसाद अनिल रसाळ या युवकाने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.


तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे राहणारे प्रसाद रसाळ व त्याचे कुटुंबीय २१ जानेवारी रोजी रात्री जेवण करुन झोपले होते, सकाळच्या सुमारास प्रसाद बराच वेळ उठला नसल्याने त्याचे वडील अनिल यांनी त्याला आवाज दिला मात्र त्याने आतून कोणताही प्रतिसाद न दिल्याने शेजारील युवकांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता प्रसाद याने घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.


घटनेची माहिती मिळताच पोलीस हवलदार किशोर तेलंग, पोलीस पाटील पांडुरंग नरके यांनी सदर ठिकाणी धाव घेत पंचनामा करत मृतदेह छवविच्छेदन साठी पाठवून दिला, तर या घटनेत प्रसाद अनिल रसाळ (वय २२) रा. माळी मळा तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे याचा मृत्यू झाला 


असून प्रसादच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याबाबत गणेश हनुमंत रसाळ (वय २७) रा. माळी मळा तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग करत आहे.


Post a Comment

0 Comments