पाण्यात बुडून बहीण - भावाचा मृत्यू

 

खड्ड्यातील पाण्यात बुडून ऊसतोड मजुराच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना करमाळा तालुक्यातील पांगरे येथे घडली आहे. प्रतीक्षा श्रावण चव्हाण (वय १३) व पृथ्वीराज श्रावण चव्हाण (वय ९, रा.


हिंगोली) अशी मृत बहीण-भावांची नावे आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील श्रावण चव्हाण हे ऊसतोड मजूर असून, गेल्या काही महिन्यांपासून करमाळा तालुक्यातील पांगरे येथे ऊसतोड करण्याकरिता आले होते. 


शेतकर्‍याने शेतात जनावरांच्या पाण्यासाठी खड्डा खणला होता. सोमवारी प्रतीक्षा आणि पृथ्वीराज खेळता खेळता खड्ड्यात उतरले होते. पोहता येत नसल्याने ते दोघेही बुडाले. 


रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.


Post a Comment

0 Comments