पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन पदी श्री.सतीश दादासाहेब मुळे तर व्हाईस चेअरमनपदी सौ.माधुरी अभय जोशी यांची बिनविरोड निवड


दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरचे नुतन चेअरमन पदी श्री.सतीश दादासाहेब मुळे यांची तर व्हाईस चेअरमन पदी सौ.माधुरी अभय जोशी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी बँकेचे माजी चेअरमन तथा मा.आमदार श्री.प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करणेत आला.


दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बॅंक लि.पंढरपूरचे संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक सन 2022-23 ते 2027-28 ही बिनविरोध पार पडली आहे.


आज दि.24 जानेवारी 2023 रोजी प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूरचे श्री.पी.सी.दुरगुडे यांचे मार्गदर्शनाखाली सदर निवडणुक पार पडली. चेअरमन पदासाठी श्री.सतीश दादासोा मुळे तर व्हा.चेअरमन पदासाठी सौ.माधुरी अभय जोशी यांचे एक-एकच अर्ज आल्याने निवडणुक बिनविरोध झाल्याचे प्राधिकृत अधिकारी श्री.दुरगुडे यांनी जाहीर केले.


  याप्रसंगी युटोपियनचे चेअरमन उमेश परिचारक, बँकेचे नुतन संचालक परिचारक राजाराम पांडुरंग, कवठेकर रजनीश दत्तात्रय, ताठे हरिष माधव, घंटी पांडुरंग पुंडलिक, कुलकर्णी शांताराम पांडुरंग, हरिदास विनायक विठ्ठल उर्फ मदन, मांगले अमित प्रफुल्ल, कटप अनंत नंदकुमार, शिंगण गणेश नागेश, उत्पात ऋषिकेश वासुदेव, कौलवार व्यंकटेश सुरेश, सौ.पाटील संगीता शितल, सुरवसे मनोज तुकाराम, अभंगराव अनिल शशीकांत, माने गजेंद्र बाबुराव आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments