पुणे हादरलं, पुण्यातील भीमा नदी पात्रात पाच दिवसांत चार मृतदेह आढळले

 

पुण्याच्या ग्रामीण भागातील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपत्रात पाच दिवसांत चार मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. दोन पुरुष आणि दोन महिलांचे मृतदेह आढळून आल्याने तर्क-वितर्क लावले जात असून एकाच कुटुंबातील हे मृतदेह असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मासेमारी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून अधिकचा शोध घेतला गेला असतांना एकूण चार मृतदेह हाती लागले आहे. यामध्ये एनडीआरएफच्या माध्यमातून अधिकचा शोध घेतला जाणार आहे, यामध्ये मुलांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. सामूहिक आत्महत्या आहे की घातपात याबाबत तर्क-वितर्क लावले जात असून पोलीसांच्या तपासात काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे मृतदेहाबरोबर मोबाईल, सोनं खरेदीचं बील आणि एक किल्ली आढळून आली आहे. तीन मृतदेह देहांचे शवविच्छेदन झाले असून त्याच्या अहवालामध्ये काय समोर येतं यावर तपास अवलंबून आहे.

पुणे ग्रामीण पोलीसांच्या माध्यमातून अधिकचा तपास केला जात असला तरी मृतदेहांची अद्यापही ओळख पटत नाहीये, त्यामुळे तपासाला दिशा मिळत नाहीये.


आत्तापर्यन्त चार मृतदेह आढळून आले आहे, यामध्ये दोन पुरुष आणि दोन स्री असल्याने पती पत्नी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात आता त्यांच्या मुलांचा शोध घेतला जात आहे.

मृतदेह हे 35 ते 45 वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. एकाच कुटुंबातील हे मृतदेह असण्याची शक्यता असल्याने आणखी मृतदेह तर नदीत नाही ना यासाठी शोधकार्य सुरू आहे.


एनडीआरएफच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू आहे. मच्छीमारांना सुरुवातीला एका स्रीकहा मृतदेह आढळून आला होता, त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एका स्रीचा मृतदेह आढळून आला होता तर दुसऱ्या दिवशी दोन पुरुषांचा मृतदेह आढळून आला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाचे आदेश दिले आहे, नदीपात्रात मृतदेह सापडल्याने दोन पथके तपासासाठी रवाना झाली आहे.


Post a Comment

0 Comments