लग्नानंतर पहिल्यांदाच सासरी पोहोचली कियारा अडवाणी, थाटात झाला अभिनेत्रीचा गृहप्रवेश

 

मुंबई  कतरिना कैफ-विकी कौशल, आलिया भट्ट-रणबीर कपूर आणि अथिया शेट्टी-केएल राहुलनंतर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने ​​सात फेरे घेतले आहेत.

कीयारा- सिद्धार्थने 7 फेब्रुवारीला राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली आहे.या दोघांच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त बॉलिवूडचे अनेक दिग्गजही सहभागी झाले होते. लग्नानंतर, कियारा आणि सिद्धार्थ या दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांकडून आशीर्वाद मागितला होता. त्यांनतर त्यांच्यावर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान हे नवं जोडपं आपल्या दिल्लीच्या घरी पोहोचलं आहे.




कियाराचं आपल्या सासरी जंगी स्वागत झालेलं दिसून येत आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते या दोघांना भरभरुन प्रेम आणि आशीर्वाद देत आहेत. नुकतंच कियारा आणि सिद्धार्थ राजस्थानमधून आपला लग्न समारंभ आटोपून मुंबईत आले होते.

मुंबई एयरपोर्टवर या नव्या जोडप्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. या नव्या जोडप्याला लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र पाहून सर्वच प्रचंड खुश आहेत. 
दरम्यान आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या दिल्लीतील घरी पोहोचले आहेत.



सिद्धार्थ मल्होत्रा हा मूळचा दिल्लीचा आहे. त्याचं संपूर्ण कुटुंब दिल्लीतील घरी वास्तव्यास आहे. कामानिमित्त सिद्धार्थ मुंबईमध्ये स्थायिक झाला आहे. तो कामातून मिळेल तो वेळ काढून दिल्लीतील आपल्या घरी जात असतो.

लग्नाच्या 2 दिवस आधीसुद्धा सिद्धार्थ दिल्लीच्या घरी पोहोचला होता. तिथूनच तो राजस्थानसाठी रवाना झाला होता. दरम्यान लग्नानंतर सिद्धार्थ पत्नी कियारासोबत पहिल्यांदाच आपल्या घरी पोहोचला आहे.

इन्स्टंट बॉलिवूडच्या इन्स्टा पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

यामध्ये सिद्धार्थचं दिल्लीतील घर विद्युतरोषणाईने चमकत आहे. तसेच ढोल-ताशा वाजवत या दोघांचा ग्रँड वेलकम केलं जात आहे. कियाराचं सासरी दणक्यात स्वागत झालं आहे. सिद्धार्थ आणि कियारा अगदी पंजाबी स्टाईलमध्ये नाचत घरात प्रवेश करताना दिसून येत आहेत.



या दोघांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 
नवी नवरी कियारा अडवाणीने यामध्ये लाल रंगाचा चुडीदार परिधान केला आहे. अभिनेत्रीच्या भांगेत सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र तिच्या सौंदर्यात आणखी भर पाडत आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थनेसुद्धा लाल रंगाचा कुर्ता घातला आहे. या दोघांनी दिल्लीला जाण्यापूर्वी पापाराझींना मिठाईचं वाटप केलं. आणि त्या सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments