अक्षय कुमार आणि साऊथ मेगास्टार मोहनलालचा लग्नातील भांगडा व्हायरल

 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतो. नुकताच एक व्हिडीओ अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात अक्षय कोणाच्यातरी लग्नात भांगडा करताना दिसत असून त्याच्यासोबत साऊथ अभिनेता मोहन लाल देखील दिसत आहे.


सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते याला खूप पसंती देत आहेत.

हॉटस्टारचे अध्यक्ष के माधवन यांचा मुलगा गौतम माधवनचा विवाह नुकताच जयपूरमध्ये पार पडला. या लग्नात बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंतचे सर्व कलाकार सहभागी झाले होते. यादरम्यान अक्षय कुमार आणि मोहनलाल यांनी एकत्र भांगडा सादर केला.


 दोन्ही कलाकार वरात्यांच्या कपड्यामध्ये ढोल-ताशांच्या तालावर नाचत आहेत. अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने या डान्स व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिलय की, 'मोहनलाल सर तुमच्यासोबतचा हा डान्स मला नेहमी लक्षात राहील, हा खूप अविस्मरणीय क्षण आहे.' असं अक्षय म्हणाला.


अक्षयचे आगामी चित्रपट

अक्षय कुमारचा सेल्फी चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इमरान हाशमी, नुसरत भरूचा आणि डायना पेंटी देखील दिसून येतील. या चित्रपटाव्यतिरिक्त अक्षय 'ओएमजी 2', 'कॅप्सूल गिल', 'गोरखा', 'बड़े मिया छोटे मियां' यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.

Post a Comment

0 Comments