पंढरपूर सिंहगड मध्ये "सायबर फॉरेन्सिक टूल्स आणि तंत्र" या विषयावर व्याख्यान संपन्न


पंढरपूर: प्रतिनिधी 

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांचे "सायबर फॉरेन्सिक टूल्स आणि तंत्र"  या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली. 


   शुक्रवार दिनांक १७ मार्च २०२३ रोजी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना "सायबर फॉरेन्सिक टूल्स आणि तंत्र" या विषयावर पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या सुरवातीस सुरज निंबाळकर यांचे स्वागत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 


   यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर म्हणाले, सायबर गुन्हेगारीही एक जागतिक समस्या निर्माण झाली आहे. अशा गुन्ह्यांत मोठ्या संख्येने महिला बळी पडत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कठोर कायदे करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. 


सायबरगुन्हा' किंवा संगणकीय गुन्हा ही संज्ञा संगणक व इंटरनेटाशी संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुन्ह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुन्ह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, प्रताधिकारभंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत असल्याचे मत पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नामदेव सावंत, समाधान वसेकर सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments