मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथे भीमा नदीच्या पाण्यावर अनोळखी 35-37 वर्ष वयाच्या पुरुषाचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसल्याने खळबळ उडाली आहे.
उचेठाण येथील पोलीस पाटील उत्तरेश्वर बाबु पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मंगळवेढा पोलिसांत अज्ञाताच्या अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.१५ मार्च रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या पुर्वी भिमा नदिच्या पात्रात उचेठाणत ते आंबेचिंचोली बंदा-याच्या पूर्व बाजुला पाण्यात
एक अनोळखी पुरुष जातीचे अंदाज वय ३५ ते ३७ वर्षाचे अंगाने मध्यम जाड, अंगात काळया रंगाची पॅन्ट व कमरेला काळया रंगाचा बेल्ट असलेला व
डाव्या हाताच्या आंगठ्याजवळ इंग्रजीत R अक्षर गोंदलेले, उजव्या हाताच्या मनगटावर लाल रंगाचा दोरा तसेच उजव्या हाताच्या पोटरीवर नागाचे चित्र गोंदलेले मयत मिळुन आले असल्याचे दिलेल्या फिर्यादीम्हंटले आहे.
0 Comments