नागपुर इथ भरचौकात पुरुषानं केली महिलेला बेदम मारहाण, कारण ऐकून व्हाल हैराण

 

नागपूर - शहरातील इंदुरा भागात कारचालकाने महिलेला शिवीगाळ देत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून जरी पटका पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.


सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून नागपूरकरांनी याचा निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आरोपी कारचालक इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जात होता. त्याचवेळी मागून दुचाकीवरून येणाऱ्या महिलेने त्याला ओवरटेक केले. महिला पुढे गेल्याने कारचालकाने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेला शिवीगाळ सहन न झाल्याने ती दुचाकीवरून उतरून कारचालकाशी वाद घालू लागली. या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादाचे अचानक हाणामारीत रुपांतर झाले.


महिला कारच्या बोनेटजवळ उभी असतानाच आरोपी कारमधून खाली उतरला आणि त्याने महिलेवर हल्ला केला. आरोपीने महिलेच्या तोंडावर अनेकदा मारहाण करत तिचे केस धरून ओढले. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने महिलेला मारहाण सुरूच ठेवली.


 केवळ मारहाणच नाही तर अत्यंत अश्लिल शब्दात त्याने महिलेला शिवीगाळ केली. या आरोपी कारचालकाचे नाव शिवशंकर श्रीवास्तव असे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे.


Post a Comment

0 Comments