सर्वांना आग्रहाचे निमंत्रण .....' आकाश ठोसरच्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्याचे लक्ष

अभिनेता आकाश ठोसरला 'सैराट' या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली.


आकाशचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच तो 'घर बंदूक बिरयानी' '  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता नुकताच आकाशनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये तो अभिनेत्री सायली पाटीलसोबत दिसत आहे. आकाश आणि सायलीनं लग्न केलं आहे का? असा प्रश्न हा फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला होता. पण असं नसून हा फोटो 'घर बंदूक बिरयानी चित्रपटाच्या सेटवरील आहे.


आकाशनं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यानं आणि सायलीनं मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहेत. या फोटोला आकाशनं कॅप्शन दिलं, 'आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण... यायचं बर का…10 दिवस'. हा फोटो शेअर करताना आकाशनं 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाच्या नावाच्या हॅशटॅगचा देखील वापर केला आहे. आकाश आणि सायली यांचा हा फोटो 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटाच्या सेटवरील आहे.

सायलीनं इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी आकाशचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करुन तिनं लिहिलं, 'नवरी तयार आहे.' सायलीची ही पोस्ट रिपोस्ट करुन अकाशनं कॅप्शनमध्ये लिहिलं, येतोय वरात घेऊन' दोघांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.


आशेच्या भांगेची नशा भारी अशी टॅगलाईन असणाऱ्या सायली आणि आकाश यांच्या 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसत आहे. कशावरून ही चकमक सुरु आहे? याचे उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. 7 एप्रिल रोजी 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आकाश आणि सायलीसोबतच नागराज मंजुळे आणि सायाजी शिंदे यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

Post a Comment

0 Comments