भरधाव पिकअपची दुचाकीस धडक, दुचाकीचालकाचा पत्नी - मुलांसमोर मृत्यू

 

सिल्लोड/ गोळेगाव : तालुक्यातील जळगाव सिल्लोड रस्त्यावर धोत्रा फाट्या जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या पीकअपने दुचाकीस जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील पतीचा जागीच मृत्यू झाला

तर पत्नी व दोन मुले असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास झाला. दिलीप उदयभान जाधव ( ४२ वर्ष रा.शेखापुर जि. बुलडाणा) असे मृताचे नाव आहे. तर रोहन ( १५), चंद्रकला ( ४०) आणि गोपाल (१०) अशी जखमींची नावे आहेत.


दिलीप जाधव हे दुचाकीवरून ( क्रमांक एम एच २८ बी एच ३७७९) पत्नी आणि दोन मुलांसह उंडणगाव येथील एका नातेवाईकांचे लग्न आटोपून धोत्रा-शिवना मार्गे बुलढाणाकडे जात होते. 


तर पिकअप रिक्षा (क्रमांक एम एच १७ बी वाय ८८४१) हा जळगावकडून नाशिककडे जात होता. धोत्रा फाट्याजवळ पिकअप रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दिलीप जाधव यांच्या जागीच मृत्यू झाला. तर पत्नी चंद्रकला मुले रोहन आणि गोपाल हे जखमी झाले आहेत.


अपघाताची माहिती मिळताच शेतकरी संघटनेचे मुक्ताराम गव्हाणे, संदीप गव्हाणे, गहिनीनाथ बँकेचे चेअरमन पिराजी मुराडे यांनी त्यांच्या वाहनातून जखमींनाउपचारासाठी सिल्लोड येथे रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती अजिंठा पोलिसांना देण्यात आली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भिंगारे, फौजदार राजू राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहन जाधव हा गंभीर असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


Post a Comment

0 Comments