पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे गेट परिक्षेत यश

पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकीचामे शिक्षण घेत असलेल्या कुमारी प्रियांका चव्हाण व कुमार बालाजी पवार यांनी गेट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.


    प्रत्येक वर्षी गेट परिक्षा ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (आय.आय.टी.) यांच्या वतीने घेण्यात येत असते. यावर्षी घेण्यात आलेल्या गेट परिक्षेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील कुमारी प्रियांका विलास चव्हाण हिने गेट परिक्षेत २७.३२ तर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील कुमार बालाजी गजानन पवार यांनी गेट परिक्षेत २६. ३ असे गुण प्राप्त करून या दोन  विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केले आहे.


     राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या गेट परिक्षेत सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून विविध परीक्षेत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे विद्यार्थी यशस्वी होत असल्याने पालकांमधुन आनंद व्यक्त होत आहे.


    यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. राजेंद्र पाटील, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अतुल आराध्ये, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अनिल निकम, प्रा. गणेश लकडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments