लातूर जिल्ह्यातील काेल्हेनगर येथील विलास तुकाराम गुरमे यांचे अपघाती निधन झाले. या अपघातात विलास यांचे वडील तुकाराम हे जखमी झाले आहेत.
बार्शी - कुर्डुवाडी रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री एका खासगी बस आणि चार चाकीचा अपघात झाला. बारामती येथून कुटुंबासह चार चाकीतून गुरमे कुटुंबीय हे लातूरला निघाले हाेते. त्याचवेळीस धाराशिव येथून पुण्याला निघालेली खासगी प्रवासी बस भरधाव वेगात येऊन गुरमेंच्या चार चाकीला धडकली.
या धडकेनंतर चार चाकी चालक विलास गुरमे हे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
वैभव गुरमे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पाेलिसांनी किशोर वैजिनाथ गताटे (रा. काटीजवळगा, ता.निलंगा,जि.लातूर) या बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हवालदार पृथ्वीराज पवार तपास करीत आहेत.
0 Comments