कोल्हापूर: प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून तरुण , कीटकनाशक प्यायला , मरता मरता बाबांना म्हणाला

 

कोल्हापूर:प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने एका युवकाने कीटकनाशक पिऊन आत्महत्याकेल्याची घटना घडली. विवेक शर्मा (वय 30) असं या इचलकरंजीत  राहणाऱ्या युवकाचं नाव आहे. नागपूरच्या मुलीने लग्नास नकार दिल्याने विवेकने कोल्हापुरातील सासने मैदानजीक असणाऱ्या बागेत आत्महत्या केली.


कोल्हापुरात कामासाठी जात असल्याचे सांगून विवेक घराबाहेर पडला होता. गुरुवारी (16 मार्च) रात्री त्याने सासने मैदानाजवळच्या एका बागेत विषारी औषध प्राशन केले. त्या परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलं असता आज उपचारादरम्यान विवेकचा मृत्यू झाला. उपचार सुरु असताना विवेकने नागपूरच्या प्रेयसीने लग्नासाठी नकार दिल्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं सांगितलं.


आत्महत्येचे प्रकार सध्या वाढत आहेत. गुरुवारीच इचलकरंजीत शॉपिंग सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावरुन एका तरुणाने उडी मारुन आत्महत्या केली. त्या तरुणाचा आयजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इचलकरंजीमधील मलाबादे चौकात महापालिकेच्या मालकीची शॉपिंग सेंटरची इमारतीमध्ये गुरुवारी सायंकाळी अचानक इमारतीच्या तिसऱ्या‍ मजल्यावरुन एका तरुणाने उडी मारली. तरुणाला आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.


दुसरीकडे, कोल्हापुरात विवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच तरुणाच्या त्रासाला कंटाळून अवघ्या 19 वर्षीय युवतीने आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना घडली. युवतीने आत्महत्येपूर्वी दोन सुसाईड नोट लिहिल्या असून त्यामध्ये तिने त्रास देणाऱ्या तरुणाला फाशीची शिक्षा व्हावी, असं म्हटलं.

Post a Comment

0 Comments