सोलापूर: आधी गर्दीत पळवलं अन् मग...... सिनेस्टाईलने 800 लिटर हातभट्टी केली जप्त

 

सोलापूर शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. अवैधरित्या शहरात आणली जाणारी ८०० लिटर हातभट्टी दारू पोलिसांनी जप्त केली आहे.


राज्यात सध्या ठिकठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. संपुर्ण राज्यात विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क कारवाई करत आहे. 


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणीत एका बलेरो वाहनातून 800 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. विजयपूर महामार्गावरून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला लागली होती. त्यानुसार पहाटेच्या सुमारास सापळा रचण्यात आला होता

हातभट्टीची वाहतूक करणारा वाहनचालक सूचना देऊन ही थांबत नव्हता, त्यामुळे पथकाने त्यांचा सिनेस्टाईल पाठलग करून पकडले. या गाडीमध्ये हतभट्टी दारूने भरलेल्या 8 रबरी ट्यूब आढळून आल्या. वाहनातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल पवार आणि श्रीनाथ राठोड अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत.


पालघर जिल्ह्यात देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत सुमारे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पालघर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मनोर वाडा रस्त्यावरील वाघोटे टोलनाक्यावर वाहन अडविले. या वाहनाची तपासणी करुन तब्बल 18 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दारूची तस्करी कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी माल वाहतुकीच्या गाडीत समोरच्या बाजूस बनावट प्लास्टिकच्या अंड्याचे ट्रे ठेवण्यात आले होते. सुमारे 560 अंड्यांच्या ट्रेमधील 16800 प्लास्टिकची बनावट अंडी होती. त्यामागे दमन बनावटीची दारू अशी अनोखी शक्कल लढवून दारूची तस्करी केली जात होती.

Post a Comment

0 Comments