परिणीता चोप्रा - राघव चढ्ढा यांची लगीनघाई ! दिल्लीत सुरू आहे साखरपुड्याची जय्यत तयारी

 

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा व परिणीतीला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.


त्यानंतर राघव चड्ढा व परिणीतीच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगल्या आहेत.

परिणीती व राघव चड्ढा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आप खासदार संजय अरोरा यांनी शुभेच्छा देत या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर पंजाबी गायक हार्डी सिंधुनेही परिणीती व राघव चड्ढा यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून परिणीती व राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. परिणीती व राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार असून लवकरच त्यांच्या साखरपुडा होणार आहे.


हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, परिणीती व राघव चड्ढा यांचा साखरपुडा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे. दिल्लीत त्यांचा साखरपुडा समारंभ होणार असून दोघांच्याही घरी याची जय्यत तयारी सुरू आहे. “परिणीती व राघव चड्ढा यांचा साखरपुडा समारंभ कुटुंबीय व मित्रपरिवार अशा मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. प्रियांका चोप्राही पती निक जोनस व मुलगी मालती मेरीसह भारतात आली आहे. परिणीतीच्या साखरपुडा समारंभाला ते उपस्थितीत राहू शकतील अशा पद्धतीनेच त्यांनी भारतातील ट्रीपचं प्लॅनिंग केलं आहे”, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


दरम्यान, परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांना दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. लंडनमध्ये एकत्र शिक्षण घेताना परिणीती व राघव यांची मैत्री झाली होती. परंतु, ते गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. जवळपास सहा महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे.

Post a Comment

0 Comments