राणी मुखर्जी रोज नवऱ्याला शिव्या घालते ..... अजब आहे कारण

 

राणी मुखर्जी  बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री. लग्नानंतर राणी अगदी मोजक्याच सिनेमात दिसते.


पण तरिही राणीची चर्चा कमी नाही. राणीने २०१४ साली अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आदित्य चोप्रासोबत लग्नगाठ बांधली. दोघांना एक मुलगी आहे. लग्नानंतर राणीने काही काळ ब्रेक घेतला होता. पण नंतर ती पुन्हा बॉलिवूडमध्ये ॲक्टिव्ह झाली. नुकताच तिचा मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातील राणीच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. आता राणीने नवऱ्यासोबतच्या नात्याबद्दल एक हैराण करणारा खुलासा केला आहे.


नेहा धूपियाच्या BFFs With Vogue या चॅट शोमध्ये राणी व बॉलिवूडचा दिग्गज डिझाईनर सब्यसाजी मुखर्जींनी हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी मजेशीर खुलासे केलेत. मी माझ्या नवऱ्याला रोज शिव्या घालते, त्याला , असं राणीने यावेळी सांगितलं. यामागचं कारणही तिने स्पष्ट केलं. तू शिव्या देतेस का, असा प्रश्न नेहा धूपियाने राणीला विचारला. यावर हसत हसत राणी म्हणाली, हो मी देते... मी रोज माझ्या नवऱ्याला शिव्या घालते. त्याला रागात बोलते. नेहाने याचं कारण विचारलं असता ती म्हणाली, तो इतका गोड वागतो की, प्रेमात मी त्याला शिव्या द्यायला लागते. आमच्या कुटुुंबात आम्ही प्रेमाने शिव्या देतो. मी कुणाला शिव्या देत असेल, रागवत असेल तर मी त्या व्यक्तीवर प्रेम करते, असं म्हणायला हरकत नाही. यावेही राणीने नवऱ्याचं प्रचंड कौतुक केलं. तो दिग्दर्शक म्हणून बेस्ट आहेच. पण पती व बाप म्हणूनही तितकाच बेस्ट आहे, असं राणीने सांगितलं.


एका जुन्या मुलाखतीत राणीने तिच्या व आदित्यच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. ती जेव्हा आदित्यला भेटले तेव्हा त्याचा घटस्फोट झाला होता. त्यामुळेच मी त्याच्यासोबत डेटवर जाऊ लागले. मी जेव्हा त्याच्यासोबत डेटवर जाऊ लागले तेव्हा तो माझा दिग्दर्शकही नव्हता. आदित्य हा स्वभावाने अतिशय लाजाळू असून तो लाइमलाइटपासून दूर असतो. त्यामुळेच आमचे नाते मी जाणीवपूर्वक प्रसिद्धीपासून दूर ठेवले. तो माझ्या घरी आला आणि माझ्या पालकांची त्याने परवानगी मागितली. त्यानंतर आम्ही डेटवर गेलो. माझ्या पालकांना आमच्या नात्याबद्दल काहीच हरकत नव्हती..., असं ती म्हणाली होती.

Post a Comment

0 Comments