मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी पाटकल येथील समाधान देविदास वाघमोडे यांच्या जर्शी गायीवर वीज पडून गाय मृत्युमुखी पडली आहे.
यामुळे वाघमोडे यांचे लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना काल रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवेढा तालुक्यात सायंकाळी पाचच्या सुमारास सर्वत्र वादळ वारे सुटले होते या वाऱ्याबरोबरच विजांचा कडकडाट देखील सुरू होता.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात या वादळी वाऱ्यामुळे मोठ मोठे धुळीचे लोट निर्माण झाले होते. या वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे तसेच वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
विजाचा कडकडाट सुरू होता. मेटकरवाडी येथील समाधान वाघमोडे यांचा पाठखल खडकी रस्त्याच्या कडेला मुक्त गोठा असून त्यांच्याकडे दहा ते बारा जर्सी गाई आहेत.
रात्री सव्वा आठच्या सुमारास येथील एका गाईवर वीज पडलेल्या त्या गाईचा जागीच मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस व विजा मुळे पशुधनाला धोका निर्माण झाला असून गेल्याच आठवड्यात नंदेश्वर येथे विजेच्या धक्क्याने तीन जनावरे मेली होती. त्यापूर्वी लक्ष्मी दहिवडी येथे देखील वाऱ्यामुळे 12 जनावरे जखमी झाली होती.
0 Comments