साता जन्माचं नातं एका क्षणात तुटलं, लग्नाच्या दिवशी स्टेजवरच नवरदेव - नववधू भिडले अन्....

 

लग्नाचा सिझन असो वा नसो, पण लग्नासंबंधित व्हिडिओज सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात. कधी वधू-वरांची धमाकेदार एन्ट्री मन जिंकते, तर कधी भन्नाट किस्से आणि हटके गोष्टी लक्ष वेधून घेतात.

लग्नाच्या निमित्ताने अनेकवेळा असे क्षण टिपले जातात, जे पाहून अनेकदा खूप हसायला येतं. असाच एक धमाकेदार व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्टेजवर उभे असलेले नववधू आणि नवरदेव अचानक एकमेकांना कसे भिडतात हे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दोघांमध्ये जबरदस्त भांडण पाहायला मिळत आहे. साता जन्माचं नातं अवघ्या काही क्षणात भांडणामुळे तुटेल की काय अशीच शंका हा व्हिडीओ पाहिल्यावर येते. हल्ली नवरदेव आणि नववधूमध्ये विविध कारणांवरून भांडणं होताना पाहायला मिळतात.

लग्न मंडपात दोघेही स्टेजवरच एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. आता हा व्हिडीओ खरा आहे की खोटा याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही, पण हा व्हिडीओ बघून तुम्हाला नक्कीच मजा येईल. व्हिडीओमध्ये WWE प्रमाणेच वधू-वरांमध्ये भांडण होत आहे. त्यांचं वाढत जाणारं भांडण पाहून शेवटी नातेवाईक मध्ये हस्तक्षेप करत दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करतात.

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @gharkekalesh नावाच्या हँडलने हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ जुना असला तरी तो सध्या व्हायरल होत आहे. अवघ्या 27 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 166.8 हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. ज्या लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे ते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत

Post a Comment

0 Comments