कर्मयोगी अभियांत्रिकीमध्ये “ऊर्जा संरक्षण आणि पर्यावरणासाठी जीवनशैली” विषयावर कार्यशाळा.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून नैसर्गिक स्त्रोतांचा पुर्नवापर करण्यासाठी आवश्यक ते संशोधन करावे तसेच ऊर्जा व पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची मूलभूत व नैतिक जबाबदारी आहे ती सर्वांनी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे असे मत रेल्वे रीक्रूटमेंट बोर्ड (आर आर बी) चे सुरक्षा सल्लागार श्री. वैष्णविप्रसाद कृष्णा रानडे यांनी व्यक्त केले. कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयामध्ये “ऊर्जा संरक्षण आणि पर्यावरणासाठी जीवनशैली” विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. महाविद्यालयाच्या “अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष” ( IQAC) अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.
प्रथम उप पाचार्य प्रा. जे एम मुडेगावकर यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली. वैष्णविप्रसाद कृष्णा रानडे यांना “अँटी रोल डाउन मेकॅनिजम फॉर मोटर वेहिकल” या विषयासाठी मिळालेल्या पेटंट साठी महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी सत्कार करून त्यांचे स्वागत केले. यानंतर डॉ. एस पी पाटील यांनी महाविद्यालयाची ओळख करून देऊन दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जा संरक्षण व त्यासाठी ची जीवनशैली यांचे महत्व विषद केले. वैष्णविप्रसाद कृष्णा रानडे यांनी ऊर्जा संरक्षणा बाबरोबर च बौद्धिक संपदा व त्याचा वापर, पेटंट दाखल कसे करावे, त्याचे काय महत्व आहे, ग्रीन एनर्जि, सोलार एनर्जि, सायबर क्राइम, कृत्रिम बुद्धीमत्ता, जैविक इंधने, सांडपाण्याचा पुर्नवापर यांसारख्या अनेक महत्वाच्या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. सदरच्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, तसेच विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भक्ति जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. धनंजय शिवपूजे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
0 Comments