' आपके आ जाने से, गाण्यावर नाचत होती शिक्षिका , अधिकाऱ्यांनी पाठवले थेट घरी .....

 

सोशल मीडियावर बरेचशे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये लहान मुलांसापासून तरुणी तरुणींसह वृद्धांचे नृत्याचे व्हिडीओ सर्वांचे लक्ष्य वेधून घेत असतात.


अशातच एका महिला शिक्षिकेचा  हिंदी चित्रपटातील गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. मात्र या व्हिडीओमुळे महिला शिक्षिकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. वर्गात केलेल्या नृत्यामुळे शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता या शिक्षिकेला वर्गात डान्स करणं चांगलेच महागात पडलं आहे.

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील या महिला शिक्षिकेचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी एका महिला शिक्षिकेने चित्रपटातील गाण्यांवर धमाकेदार नृत्य केले. यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या शिक्षकांनी या नृत्यानंतर फ्लाइंग किस देखील दिली. प्रशिक्षणादरम्यान सरकारी शिक्षक आणि शिक्षिकांनी गाण्यावर ठेका धरला होता.

शिवपुरी येथील गव्हर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल ऑफ एक्सलन्स, करैरा येथील शाळेत हा सर्व प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ 16 मे चा असल्याचे म्हटलं जात आहे. प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान शिक्षिकेने केलेला हा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी शिक्षिकेची स्तुती केली आहे तर अनेकांनी हे चुकीचे कृत्य आहे असे म्हटलं आहे. शिक्षणाच्या मंदिरात शिक्षकांनी असे नाचू नये, असे काही युजर्सचे म्हणणे आहे.

करैरा येथे शिक्षण विभागाने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. शिक्षकांना सतत आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे हा प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यामध्ये शिक्षक वर्गात रंजक आणि आनंददायी वातावरणात आपले कौशल्य विकसित करू शकतात. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक शिक्षिका दिल बहलता है मेरा आपके आ जाने से मधील 'मे से मीना से ना साकी...' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तर शेजारीच नरवर सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी संजीव अग्रवाल हे देखील दिसत आहेत. त्यानंतर संजीव अग्रवाल हे देखील नाचण्यात सहभागी झाले. यादरम्यान त्यांनी केलेली फ्लाइंग किसची अॅक्शन चर्चेचा विषय ठरली आहे.

Post a Comment

0 Comments