पंढरपूर: S T बसचे स्टिअरिंग लॉक , कारला फरफटत नेले , पंढरपूर- मल्हारपेठ मार्गावर घटना...

 

भरधाव एसटी बसचे स्टिअरिंग लॉक झाले आणि कारला फरफटत नेल्याची घटना पंढरपूर- मल्हारपेठ मार्गावर घडली.


या अपघातात कारचालकासह दोघे जण जखमी झाले. कारचालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.

हा अपघात रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कटफळ (शेरेवाडी) स्टॉपजवळ घडला. कार चालक सोमनाथ गेनदेव शिंदे (३५) व केदारी भागवत पाटील, (वय ४५, दोघेही रा. निमगाव, ता. माढा), अशी जखमींची नावे आहेत.


Post a Comment

0 Comments