सोलापूर - इंधन चोरांची हिंमत वाढली, अधिकाऱ्यांच्या‎ उठले जीवावर

 

Pandharpur live : सोलापूर  23 मे, (हिं.स.) - लोणीतून दर महिना १५‎ मालगाड्या इंधन भरून पाकणी‎ रेल्वे स्थानकावर येतात. तिथून‎ पेट्रोलियम कंपन्यांच्या रूळावर‎ जातात. स्थानकावर रेल्वे सुरक्षा‎ दलातील जवान बंदोबस्ताला‎ असतात.

कंपनी कार्यक्षेत्रातील‎ रूळावर गेली की त्यांची जबाबदारी‎ संपते आणि तिथेच रात्रीचा खेळ‎ सुरू होतो. टपून बसलेले इंधन चोर‎ थेट इंधनाने भरलेल्या वॅगनवरच‎ डल्ला मारतात. कंपनीची पूर्ण‎ सुरक्षाही नसते.‎ गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार‎ सुरू आहे. चोरांच्या टोळ्या तयार‎ झाल्या. त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली‎ आणि त्यांची हिंमत इतकी वाढली‎ की, त्यांना रोखणाऱ्या अधिकाऱ्यांच्या‎ जीवावरही ते उठले. इंडियन ऑइल‎ कंपनीचे उपव्यवस्थापक कासीम‎ खेती यांच्यावर मध्यरात्री‎ झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने‎ पाकणीची इंधनचोरी पुन्हा एकदा‎ चर्चेत आली.‎

Post a Comment

0 Comments